imports And Exports

आयात-निर्यात कोडचा गैरवापर करून निर्यात परतावा मिळविणारी एक टोळी डीआरआयने पकडली आहे. ही टोळी अशा आयात-निर्यात कोडचा वापर करून बनावट निर्यात पावत्या तयार करीत असे. त्याआधारे वस्तूंची निर्यात केली जात असे, मात्र त्या वस्तू कमी दर्जाच्या किंवा पावत्यांवर नमूद असलेल्या किंमतीपेक्षा खूप कमी मूल्याच्या असत. अशा निर्यातीच्या वाढीव रकमेच्या पावत्या या टोळीकडून सादर केल्या जात आणि त्याआधारे निर्यात शुल्काचा परतावा मिळवला जात असे. डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक संचालनालयाने याप्रकरणी कारवाई केली आहे.

    मुंबई : सरकारच्या आयात-निर्यात कोडचा गैरवापर करून निर्यात परतावा खिशात घालणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय महसुल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छडा लावला आहे.हा घोटाळा सुमारे 1800 कोटी रुपयांचा असल्याचे समजते. या घोटाळ्याचे मुख्य केंद्र मुंबईत असून या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

    वस्तूंची निर्यात करणाऱ्यांना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी निर्यात शुल्काचा परतावादेखील मिळतो. हा परतावा मिळविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन परिषदेकडे नोंदणी करून निर्यात कोड घ्यावा लागतो. याच कोडचा गैरवापर डीआरआयने उघडकीस आणला आहे.

    आयात-निर्यात कोडचा गैरवापर करून निर्यात परतावा मिळविणारी एक टोळी डीआरआयने पकडली आहे. ही टोळी अशा आयात-निर्यात कोडचा वापर करून बनावट निर्यात पावत्या तयार करीत असे. त्याआधारे वस्तूंची निर्यात केली जात असे, मात्र त्या वस्तू कमी दर्जाच्या किंवा पावत्यांवर नमूद असलेल्या किंमतीपेक्षा खूप कमी मूल्याच्या असत. अशा निर्यातीच्या वाढीव रकमेच्या पावत्या या टोळीकडून सादर केल्या जात आणि त्याआधारे निर्यात शुल्काचा परतावा मिळवला जात असे. डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक संचालनालयाने याप्रकरणी कारवाई केली आहे.

    124 बनावट कंपन्या

    • याप्रकरणी राजन सारंग व प्रशांत मोडक, या दोघांना याआधीच अटक झाली आहे. त्यांच्या चौकशीत नितीन चौहान याचे नाव समोर आले.
    • चौहान हा या घोटाळ्यासाठी आवश्यक असलेले कोड जमा करण्याचे काम करीत होता. तसेच पावत्या तयार करणे, गरज भासल्यास अर्थसाहाय्य उभे करणे व परतावा प्राप्त झाल्यानंतर रोखीचे व्यवस्थापन करणे, अशी कामे तो करीत होता. त्याला भाईंदर येथून अटक झाली आहे. हे तिघेही या घोटाळ्याचे सूत्राधार आहेत.
    • हा घोटाळा एकाचवेळी मुंबई, सुरत व दिल्लीहून चालवला जात असून त्यासाठी या टोळीने 124 बनावट कंपन्यादेखील तयार केल्याचे तपासात आढळले आहे.