corona virus

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देताना अनेकांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत पालिकेच्या ५ हजार ५०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉयसह  इतर विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील सुमारे ४ हजार २७६ कर्मचा-यांनी कोरोनावर मात करुन  कामावर हजर झाले आहेत. १८४ कर्मचा-यांचा कोरोनाने  मृत्यू झाला आहे.

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. विविध प्रभावी उपाययोजना केल्याने सध्या कोरोना नियंत्रणात आला आहे. या लढ्यात पालिकेतील १८४ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत पालिकेच्या साडेपाच हजार कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील आतापर्यंत तब्बल ४ हजार २७६ कर्मचा-यांनी कोरोनावर मात करुन  कामावर हजर झाले आहेत.

कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर पहिल्या दिवसापासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. सव्वालाख कर्मचा-यांपैकी बहुतांशी कर्मचारी कोरोनाच्या कामांत सहभागी झाले. मुंबईतील अनेक भागात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागा व्यतिरिक्त इतर विभागातील कर्मचा-यांनाही या लढ्यात उतरवण्यात आले.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देताना अनेकांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत पालिकेच्या ५ हजार ५०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉयसह  इतर विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील सुमारे ४ हजार २७६ कर्मचा-यांनी कोरोनावर मात करुन  कामावर हजर झाले आहेत. १८४ कर्मचा-यांचा कोरोनाने  मृत्यू झाला आहे.

 कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत

कोरोनाचे काम करताना कोरोना होऊन मृत झालेल्या कर्मचा-यांच्या आतापर्यंत ५० कुटुंबीयांना मुंबई महापालिकेने प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत केली आहे. तर, १७ जणांना पालिकेत नोकरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे पालिकेने १५३ प्रस्ताव पाठवले होते. मात्र, यातील १३ जणांना केंद्राने मदत केली. तर ८३ प्रस्ताव नाकारले. मात्र केंद्राने नाकारलेल्या प्रस्तावांतील सर्व मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.