राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद; ४०२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

रविवारी राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,३१,८१५ झाली आहे. आज २२,५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७१,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : रविवारी राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,३१,८१५ झाली आहे. आज २२,५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७१,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात रविवारी ४०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण ४०२ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४१२ ने वाढली आहे. हे ४१२ मृत्यू, पुणे-६८, लातूर-५४, पालघर-४०, नाशिक-२९, भंडारा-२७, कोल्हापूर-२५, सातारा-२०, अहमदनगर-१८, औरंगाबाद-१५, गडचिरोली-१५, नांदेड-१३, रत्नागिरी-१२, गोंदिया-११, नागपूर-११, सांगली-११, सोलापूर-९, ठाणे-९, हिंगोली-५, चंद्रपूर-४, जळगाव-४, बीड-३, बुलढाणा-३, नंदूरबार-३, परभणी-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
    सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १०६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०४६२२ एवढी झाली आहे. तर २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४७९७ मृत्यूची नोंद करण्यात आली.