वरळी, लोअर परळ परिसरातील १९ कंटेनमेंट झोन रद्द

मुंबई :वरळी, एलफिस्टन, प्रभादेवी भागात गेल्या १५ दिवसांत एकही कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. पालिकेने केलेली अंमलबजावणी व नागरिकांचा प्रतिसाद यामुळे कोरोनावर मात करणे शक्य

 मुंबई : वरळी,  एलफिस्टन, प्रभादेवी भागात गेल्या १५ दिवसांत एकही कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. पालिकेने केलेली अंमलबजावणी व नागरिकांचा प्रतिसाद यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे या परिसरातील १९ कंटेनमेंट झोनमधील बंद उठवण्यात आल्याची माहिती जी साऊथचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.यामुळे १९ कंटेनमेंट झोनमधील बंदी उठवल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

वरळी, लोअर परळ परिसरात ‘कोरोना’ रोखण्यासाठी प्रभावी   क्वारंटाईन, दर्जेदार उपचार, रुग्ण शोधमोहीम, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या सगळ्या प्रयत्नांना यश येत असल्याचे ते म्हणाले. या विभागात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले  असले तरी कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही याच विभागात सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात आता कोरोना नियंत्रणात आला असला तरी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची, संशयितांची तपासणी वेगात सुरू असून क्वारेंटाइनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जी-साऊथ विभागात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली असली तरी सुमारे ३५० पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. तर आतापर्यंत ११८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या विभागात कोरोनामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  लोढा वर्ल्ड टॉवर, आनंद छाया बिल्डिंग, सतीआकार सोसायटी, सिद्धीप्रभा बिल्डिंग, उत्कर्ष बिल्डिंग, विरा हाऊस बिल्डिंग, शिवकृपा बिल्डिंग, विष्णू ज्योती सदन, लोखंडवाला रेसिडन्सी टॉवर, जरीमरी सोसायटी अशा भागांची कंटेनमेंट झोनमधून सुटका करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही गेल्या १४ दिवसांपासून ज्या इमारतींमध्ये रुग्ण आढळले नाहीत अशी ठिकाणेही कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आल्याचे ते म्हणाले.