बदली सरकार? महाराष्ट्र सरकारने केल्या 30 जुलै ते 20 ऑगस्ट या 20 दिवसांच्या कालावधीत तब्बल 19 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

या बदल्या चर्चेत आल्या आहेत त्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या बदलीमुळे. निधी चौधरी यांनी तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, दरडी कोसळणे अशा नैसर्गीक आपत्तींच्या काळात रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे काम केले आहे.

  दिनांक 30 जुलै 2021 ते 20 ऑगस्ट 2021 या 20 दिवसांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने तब्बल 19 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कामाचा भाग म्हणून दरवर्षी एका ठरावीक कालमर्यादेत सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. या प्रक्रियेचा भाग म्हणून या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  या बदल्या चर्चेत आल्या आहेत त्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या बदलीमुळे. निधी चौधरी यांनी तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, दरडी कोसळणे अशा नैसर्गीक आपत्तींच्या काळात रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे काम केले आहे.

  दरम्यान, निधी चौधरी यांची मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणकर हे या आधी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीम्हणून कार्यरत होते.

  या पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

  डॉ महेंद्र कल्याणकर यांची रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  एम. बी. वरभुवन (मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव) यांची बदली करुन त्यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्त केले आहे.

  संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

  निधी चौधरी (रायगड जिल्हाधिकारी) यांना मुंबईच्या आयटी, डायरेक्टर म्हणून नियुक्त केले आहे.

  दीपक सिंगला (जिल्हाधिकारी, गडचिरोली) यांना सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्त केले आहे.

  मागील महिन्यात 30 जुलैला बदली झालेले अधिकारी

  संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

  अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

  मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

  सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

  प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

  कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

  जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

  एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

  एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

  राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

  जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

  रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

  एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

  दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.