iPhone buyers will get a discount of up to Rs 63,000, find out Apple's trade-in scheme

केम्पेगौडा विमानतळावर अमेरिकेचे पासपोर्ट असलेले मूळचे भारतीय दाम्पत्य एअर फ्रान्स एएफ १९४ या विमानातून शनिवारी पहाटे उतरले. त्यांच्याकडे २०६ आयफोन सापडले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एमयूव्ही आणि बँकांचे ३७ कार्ड जप्त केले आहे.

    मुंबई : मोबाइल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल २०६ आयफोन घेऊन आलेल्या दाम्पत्याला सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पकडले. जप्त केलेल्या आयफोनची किंमत जवळपास २.८ कोटी रुपये इतकी आहे.

    केम्पेगौडा विमानतळावर अमेरिकेचे पासपोर्ट असलेले मूळचे भारतीय दाम्पत्य एअर फ्रान्स एएफ १९४ या विमानातून शनिवारी पहाटे उतरले. त्यांच्याकडे २०६ आयफोन सापडले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एमयूव्ही आणि बँकांचे ३७ कार्ड जप्त केले आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार, ४९ वर्षीय व्यक्ती आणि त्याची ३८ वर्षीय पत्नी यांच्याकडे बॅगांमध्ये तस्करीच्या वस्तू असल्याचा संशय आला. अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात काळे बॉक्स आढळून आले. त्यांच्यात २०६ आयफोन आढळून आले. त्यांची भारतीय बाजारात २ कोटी ७४ लाख १९ हजार ४०० रुपये किंमत आहे.

    हे दाम्पत्य मुंबईहून फ्रान्सला १३ फेब्रुवारीला निघाले होते. ते बेंगळुरूला गेले. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आयफोन होते. बेंगळुरूत आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटशी त्यांचे धागेदोरे जुळलेले असावेत. ते बेंगळुरूत हे फोन विकणार असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. या दाम्पत्याकडे एक कार आढळून आली आहे. या कारचा वापर ते तस्करीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी करत होते. त्यांच्याकडे विविध बँकांचे ३७ डेबिट आणि क्रेडिट कार्डही सापडले आहेत. त्यांना रविवारी कोर्टात हजर केले असता, १२ मार्चपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.