manor police station

दिवसा ढवळ्या आरोपी पोलीस स्थानकातून पळून जाणे आणि अधिकाऱ्यांच्या सुदैवाने अवघ्या कांही तासातच सापडणे, या कारणावरून मनोर पोलीस स्थानक गेले दोन दिबस चर्चेत आहे.

विनायक पवार, मुंबई. दिवसा ढवळ्या आरोपी पोलीस स्थानकातून पळून जाणे आणि अधिकाऱ्यांच्या सुदैवाने अवघ्या कांही तासातच सापडणे, या कारणावरून मनोर पोलीस स्थानक गेले दोन दिबस चर्चेत आहे.

वीज चोरीच्या आरोपात मनोर पोलिसांनी संजय रमण पाडेकर वय ३० वर्षे, गणेश रमण पाडेकर वय २८ वर्षे अशा दोन आरोपींना टाकवाळ खडी मशीन पाडा येथून शुक्रवारी सकाळी ११च्या दरम्यान अटक करण्यात आली होती. ठाणे अंमलदार यांनी पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यांना कुठलीही माहिती न देता तसेच पोलीस ठाण्यात आरोपी गार्ड ड्युटी करिता नेमलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कोणतीही माहिती न देता सदर दोनही आरोपींना पोलिस स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये ठाणे अंमलदाने बसवून ठेवले. व आपल्या कामाला लागले.

आपल्यावर कोणाचेही लक्ष नाही असे जेव्हा अटकेतील आरोपींनी समजले तेव्हा त्यांनी संधी साधून ठाणे अंमलदार यांची नजर चुकवून कायदेशीर रखवलीतून पळून गेले. गेले तर गेले, पण चक्क पोलीस स्थानकाच्या आवारातून एक सकुटी वर बसून गायब झाले.

लगेचच सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले. दोघेही आरोपी एक स्कूटी हमरापूर मार्गे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता टेन नाका जवळील जंगलात दोन्ही आरोपींच्या अवघ्या २ तासात पकडून वरिष्ठांच्या नाराजीचा प्रकोप नक्की कमी केला असावा.

सदर आरोपींवर गुन्हा क्र. १३८/२०२० IPC २९४, १८६, १९८, ५०४, ५०६ कलाम अंतर्गत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.