कोरोना काळात २ लाख २८ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; म्युकरमायकोसीसच्या जनजागृतीबाबत आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोना काळ आव्हानाचा असून सोशल डिस्टंसिंग, चटकन होणार संसर्ग सारखे अडथळे असून देखील र्जायत गेल्या वर्षभरात सुमारे २ लाख २८ हजार मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची सकारात्मक माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर नेमके याच काळात नजरेवर घाला घालणारा म्युकरमायकोसिस आजार बळावला असल्याने त्याबाबत जनजागरूकता करण्यात यावी असे आवाहन देखील जागतिक नेत्र दान दिनाच्या मुहूर्तावर टोपे यांनी केले.

    मुंबई : कोरोना काळ आव्हानाचा असून सोशल डिस्टंसिंग, चटकन होणार संसर्ग सारखे अडथळे असून देखील र्जायत गेल्या वर्षभरात सुमारे २ लाख २८ हजार मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची सकारात्मक माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर नेमके याच काळात नजरेवर घाला घालणारा म्युकरमायकोसिस आजार बळावला असल्याने त्याबाबत जनजागरूकता करण्यात यावी असे आवाहन देखील जागतिक नेत्र दान दिनाच्या मुहूर्तावर टोपे यांनी केले.

    कोरोना रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजारचा संसर्ग झाल्यास क्वचित प्रसंगी डोळा निकामी होतो. त्या पार्श्वभूमीवर १० जून रोजीचा जागतिक नेत्रदान दिन साजरा होत आहे. त्यामुळे १० ते १६ जून या कालावधीत दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यासाठी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक व आरोग्य कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांतर्गत मधुमेह रुग्णांकरीता नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून त्या रुग्णांची फंडस स्कोपी करणे तसेच म्युकरमायकोसिस डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

    तसेच कोरोना काळात वेबीनार अथवा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लहान मुलांमधील अंधत्व, कोरोनापश्चात म्युकरमायकोसिस या विषयावर नेत्रतज्ज्ञांनी , स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत प्रतिबंधक उपचार यावर चर्चासत्र आयोजित करावेत, म्युकरमायकोसिसमध्ये डोळयाची निगा कशी करावी याबाबत जनजागृती करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तर राज्यात आजमितीस ६९ नेत्र पेढया, ७७ नेत्र संकलन केंद्र, १६७ नेत्र संकलन केंद्र कार्यरत आहेत. गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीशी लढा देत असून देखिल २ लाख २८ हजार इतक्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या. १३५५ नेत्र बुब्बुळे संकलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

    १० जून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन

    सरकारी सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचे नेत्र चिकित्सतेत निस्सीम सेवा असून त्यांनी ८० हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहिनांचे जीवन प्रकाशमय केले. डॉ. भालचंद्र यांचा जन्म दिन आणि मृत्यू १० जून असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती निमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरु आहेत.

    हे सुद्धा वाचा