मुंबईत उद्यापासून २० टक्के पाणीकपात, महापालिकेचा मोठा निर्णय

  • सध्या सात तलावातील जलसाठा फक्त ४.९ लाख मिलियन आहे. परंतु जलाशयाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा फक्त ३५ टक्के ऐवढाच आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने उद्यापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून शहरात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्यासह त्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सात तलावातील जलसाठा फक्त ४.९ लाख मिलियन आहे. परंतु जलाशयाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा फक्त ३५ टक्के ऐवढाच आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे.   

मुंबईकरांना योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु सध्या फक्त ४ लाख ९३ हजार ६७५ दशलक्ष लिटर पाणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणी कपातीची झळ सोसावी लागणार आहे. येत्या १ ऑक्टोंबरपर्यंत सात तलावातील एकूण जलसाठा १४.५  लाख मिलियन व्हायला हवा. असे झाल्यास शहराला वर्षाअखेरपर्यंत पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. मात्र  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.