प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शनिवारी राज्यात २०,२९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,१३,२१५ झाली आहे. आज ३१,९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७६,५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई: शनिवारी राज्यात २०,२९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,१३,२१५ झाली आहे. आज ३१,९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७६,५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ४४३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८९ ने वाढली आहे. हे ३८९ मृत्यू, नाशिक-५३, पुणे-५०, ठाणे-४०, भंडारा-३५, अहमदनगर-२४, लातूर-२४, औरंगाबाद-२१, रत्नागिरी-१७, सोलापूर-१५, पालघर-१४, सातारा-१४, रायगड-१२, वर्धा-९, कोल्हापूर-८, नागपूर-८, नंदूरबार-८, बुलढाणा-७, चंद्रपूर-७, गडचिरोली-५, जालना-४, नांदेड-३, परभणी-३, सांगली-३, उस्मानाबाद-२, गोंदिया-१, जळगाव-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे.
    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,१३,२१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १०३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०३५६० एवढी झाली आहे. तर २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४७७५ मृत्यूची नोंद करण्यात आली.