राज्यात २०३३ नवे रुग्ण

५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्ण – ३५,०५८ मुंबई :राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची

५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्ण – ३५,०५८

 

 मुंबई : राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७४९ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ८४३७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसाला दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सलग दोन दिवस राज्यात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तसेच ५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबई ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद २, अहमदनगर २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. 

या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे. मृतांमध्ये ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यात सध्या १६८१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,०४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६०.४७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

सध्या राज्यात ३,६६,२४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८,६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये सर्व्हे 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांमध्ये कोविड१९ च्या अनुषंगाने समाजाधारित सर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे. हे सर्वेक्षण पार पाडण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्था आवश्यक तांत्रिक सहकार्य करत आहेत. या ६९ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (ऍन्टीबॉडी) शोध या प्रकारे घेण्यात येणार आहे. कोविड१९ प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

१ मुंबई महानगरपालिका २१३३५ ७५७ 

२ ठाणे २३० ४ 

३ ठाणे मनपा १८०४ १८ 

४ नवी मुंबई मनपा १३८२ २२ 

५ कल्याण डोंबवली मनपा ५३३ ६ 

६ उल्हासनगर मनपा १०१ ० 

७ भिवंडी निजामपूर मनपा ४८ ३ 

८ मीरा भाईंदर मनपा ३०४ ४ 

९ पालघर ६५ ३ 

१० वसई विरार मनपा ३७२ ११ 

११ रायगड २५६ ५ 

१२ पनवेल मनपा २१६ ११ 

ठाणे मंडळ एकूण२६६४६८४४ 

१३ नाशिक १०६ ० 

१४ नाशिक मनपा ७४ १ 

१५ मालेगाव मनपा ६७७ ३४ 

१६ अहमदनगर ६५ ५ 

१७ अहमदनगर मनपा १९ ० 

१८ धुळे १२ ३ 

१९ धुळे मनपा ७१ ५ 

२० जळगाव २३० २९ 

२१ जळगाव मनपा ६२ ४ 

२२ नंदूरबार २५ २ 

नाशिक मंडळ एकूण१३४१८३ 

२३ पुणे २०४ ५ 

२४ पुणे मनपा ३७०७ १९६ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा १६० ४ 

२६ सोलापूर ९ १ 

२७ सोलापूर मनपा ४२० २४ 

२८ सातारा १४० २ 

पुणे मंडळ एकूण४६४०२३२ 

२९ कोल्हापूर ४४ १ 

३० कोल्हापूर मनपा ८ ० 

३१ सांगली ४५ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८ १ 

३३ सिंधुदुर्ग १० ० 

३४ रत्नागिरी १०१ ३ 

कोल्हापूर मंडळ एकूण२१६५ 

३५ औरंगाबाद १६ ० 

३६ औरंगाबाद मनपा ९५८ ३३ 

३७ जालना ३६ ० 

३८ हिंगोली १०४ ० 

३९ परभणी ५ १ 

४० परभणी मनपा २ ० 

औरंगाबाद मंडळ एकूण११२१३४ 

४१ लातूर ४७ २ 

४२ लातूर मनपा ३ ० 

४३ उस्मानाबाद ११ ० 

४४ बीड ३ ० 

४५ नांदेड ९ ० 

४६ नांदेड मनपा ६९ ४ 

लातूर मंडळ एकूण१४२६ 

४७ अकोला २८ १ 

४८ अकोला मनपा २४६ १३ 

४९ अमरावती ७ २ 

५० अमरावती मनपा १०८ १२ 

५१ यवतमाळ १०० ० 

५२ बुलढाणा ३० १ 

५३ वाशिम ३ ० 

अकोला मंडळ एकूण५२२२९ 

५४ नागपूर २ ० 

५५ नागपूर मनपा ३७३ ४ 

५६ वर्धा ३ १ 

५७ भंडारा ३ ० 

५८ गोंदिया १ ० 

५९ चंद्रपूर १ ० 

६० चंद्रपूर मनपा ४ ० 

६१ गडचिरोली ० ० 

नागपूर एकूण३८७५ 

इतर राज्ये४३११ 

एकूण३५०५८१२४९