corona virus

मुंबई : मंगळवारी राज्यात २०,४८२ नवीन कोरोना रुग्णांचे (corona patients) निदान करण्यात आले. आता राज्यात एकूण कोरोना रुग्ण १०,९७,८५६ झाले आहेत. तर आज १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७,७५,२७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील (maharashtra state) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,९१,७९७ ॲक्टिव्ह रुग्ण (active patients) आहेत.

दरम्यान राज्यात आज ५१५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९७ मृत्यू ठाणे -२४, कोल्हापूर -२२, अहमदनगर -१३, नागपूर -११, औरंगाबाद -५, सोलापूर -४, पुणे -४, नांदेड -३, सांगली -३, नाशिक -२,अमरावती -१, नंदूरबार -१, पालघर -१, रायगड -१, रत्नागिरी -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४,०९,०६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,९७,८५६ (२०.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १७,३४,१६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून ३७,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.