धारावीत आढळले नवीन २१ कोरोनाबाधित

मुंबई : धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून धारावीत गेल्या २४ तासांत २१ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

 मुंबई : धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून धारावीत गेल्या २४ तासांत २१ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.   त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या २४१  वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जी नार्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.   

गेल्या २४ तासांत २१ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प ,  इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी , सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला,  कुंची कुरवे नगर,  या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमुळे हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४१ वर पोहोचली असून त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे.