धारावीत २१ नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या २०८९ वर ; दादर ३४ तर माहीम मध्ये ही २० रुग्ण मुंबई : धारावीतील परिस्थिती मंगळवारी ही नियंत्रणात असल्याचे दिसून आले. धारावीत आज केवळ २१ नवीन रुग्णांची नोंद

धारावीतील रुग्णसंख्या २०८९ वर  ; दादर ३४ तर माहीम मध्ये ही २० रुग्ण


मुंबई :  धारावीतील परिस्थिती मंगळवारी ही नियंत्रणात असल्याचे दिसून आले. धारावीत  आज केवळ २१ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या २०८९ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असली तरी कालच्या तुलनेत रुग्णासंख्या काहीशी वाढली असल्याचे समोर आले.         

धारावीत मंगळवारी २१ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २०८९ वर पोहोचली आहे. आज ही कुणीही रुग्ण दगावला नसून  मृतांचा आकडा ७७ इतका झाला आहे. तर माहीम मध्ये आज २० नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ८१२ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतका आहे. तर दादर मध्ये आज ३४ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या ही ५७४ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १६ मृत्यू झाले आहेत. 

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ७५ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३४७५ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७ इतका आहे.