प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील(Mumbai) डोंगर उतारावरील सुमारे २१ हजार झोपड्या दरडीच्या(Landslide Situation Near 21 Thousand Huts) दाढेत आहेत.

  मुंबई: मुंबईतील(Mumbai) डोंगर उतारावरील सुमारे २१ हजार झोपड्या दरडीच्या(Landslide Situation Near 21 Thousand Huts) दाढेत आहेत. झोपड्याना संरक्षक भिंती(Safety Wall) बांधण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली जाते. पण कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या निधीचा योग्य विनियोग होत नाही. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या भिंती बांधल्या जातात. माळीण दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचे सर्वेक्षण हाती घेऊन उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.

  घाटकोपर पश्चिम येथील असल्फा व्हिलेज, शिव येथील एन्टॉप हिल, चेंबूर- वाशीनाका, भांडुप, कुर्ल्यातील विस्तीर्ण कसाई वाडा आदी ठिकाणच्या दरडीखाली सुमारे २१ हजार झोपड्या वसल्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या या झोपड्या एकमेकांना आधार देत अनेक वर्षापासून दरडीखाली वसल्या आहेत. या झोपड्यांवर कोणताही तोडगा, उपाययोजना पालिका व् सबंधित यंत्रणेने काढलेला दिसत नाही. या झोपड्यांचे काय? याबाबत विकास आराखड्यात काय नियोजन केले आहे, याची अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे पाऊस जवळ आला की येथील रहिवाशांना दरडीच्या भयाखाली जीव मुठीत घेऊन राहावे लागते, असे येथील काही रहिवाशांनी सांगितले.

  एकीकडे दरडीच्या भयाखाली तर दुसरीकडे झोपडी दादांच्या दहशतीखाली येथील रहिवाशांना राहावे लागते आहे. पावसाळा जवळ आला की काही दिवस अगोदर येथे राहणे धोक्याचे आहे, तातडीने स्थलांतरित करावे, अशा नोटिसा पालिकेचे अधिकारी चिटकावून जातात. ते पुढील पावसापर्यंत फिरकत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

  यंदाही पावसापूर्वी अतिधोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करून रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या नोटिसा दिल्या जातील. त्वरीत स्थलांतरीत व्हावे, अशा नोटिशीमध्ये सूचना असतात. मात्र इतकी कुटुंबे स्थलांतरीत कुठे होणार हा प्रश्न असल्याने पाऊस संपेपर्यंत जीव मुठीत घेऊन येथील अनेक रहिवाशांना त्याच झोपड्यात राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो असे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.

  उपाययोजना कागदावरच
  अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या भिंती बांधल्या जातात. काही वर्षापूर्वी आयआयटीने केलेल्या सर्वेत अनेक वसाहतीना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. काही उपाय योजनाही सुचवल्या, पण त्याची अमलबजावणी अध्याप झालेली नाही. माळीण दुर्घटने नंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचे सर्वेक्षण हाती घेऊन उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा निर्णय अजूनही कागदावरच राहिला आहे.