राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद तर ४२५ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू?

गुरुवारी राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,७२,१८० झाली आहे. आज ३४,३७० रुग्ण बरे होऊन घरी गेली. राज्यात आजपर्यंत एकूण ५२,७६,२०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०१,०४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई: गुरुवारी राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,७२,१८० झाली आहे. आज ३४,३७० रुग्ण बरे होऊन घरी गेली. राज्यात आजपर्यंत एकूण ५२,७६,२०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०१,०४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ४२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४५९ ने वाढली आहे.

    हे ४५९ मृत्यू, पुणे- १०३, वर्धा- ५६, ठाणे- ५५, रत्नागिरी- ३९, नागपूर- ३५, भंडारा- २८, अहमदनगर- २७, सातारा- २२, सांगली- २१, सोलापूर- १८, नाशिक- १२, वाशिम- ८, बीड- ७, कोल्हापूर- ५, बुलढाणा- ४, नांदेड- ४, रायगड- ४, नंदूरबार- ३, चंद्रपूर- २, लातूर- २, यवतमाळ- २, पालघर- १ आणि परभणी- १असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४०,८६,११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,७२,१८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,१८,२७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १२५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०१५९८ एवढी झाली आहे. तर ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४७२० मृत्यूची नोंद करण्यात आली.