चिंता वाढली : महाराष्ट्रात एका दिवसात 216 जणांचा कोरोनाने मृत्यू, मृत्यूदर वाढला, राजकीय सभा, यात्रा ठरतायत जनतेची अंत्ययात्रा

मुंबईत देखील बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत संक्रमीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत मागील 24 तासांत 272 कोरोना रुग्ण बरे झाले असून 343 नवीन कोरोना बाधीत रुग्ण समोर आले आहेत. तर, चार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 2 हजार 855 सक्रीय रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. मागील काही महिने रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे, राज्य सरकारने निर्बंध शिथील केले मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल तर नाही ना? अशी भिती सामान्य जनतेला आहे.

    महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासात 4 हजार 380 कोरोना रुग्ण बरे झाले असून 5 हजार 31 नवीन कोरोना बाधीत रुग्ण समोर आले आहेत. तर, 216 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ होऊन 2.12 टक्क्यांवर गेली आहे.

    मुंबईची वाटचाल डेंजर झोनच्या दिशेने

    मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, इथेही चिंताजनक परिस्थिती आहे. मुंबईत देखील बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत संक्रमीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत मागील 24 तासांत 272 कोरोना रुग्ण बरे झाले असून 343 नवीन कोरोना बाधीत रुग्ण समोर आले आहेत. तर, चार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 2 हजार 855 सक्रीय रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, राज्यातील या वाढत्या कोरोना बाधीतांच्या रुग्णसंखेला राजकीय सभा, यात्रांना जबाबदार धरायचं का असा सवाल जनता विचारत आहे.