पालघर जिल्ह्यात २४ तासांत २२ नव्या कोव्हीड १९ च्या रुग्णांची नोंद

कोव्हीड १९ च्या रुग्णांची संख्या पोहचली ३८९ वर पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २२ नव्या कोव्हीड १९ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारी नुसार

कोव्हीड १९ च्या रुग्णांची संख्या पोहचली ३८९ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २२ नव्या कोव्हीड १९ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातल्या कोव्हीड १९ च्या रूग्णांची संख्या आता ३८९ इतकी झाली आहे. त्यापैकी १६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बऱ्या झालेल्या १९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.दररोज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रुग्णांची संख्या ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातली असून ती आजच्या घडीला ३४१ इतकी झाली आहे.