नेस्को जम्बाे कोविड केंद्रात २४ तास रोगनिदान प्रयोगशाळा

नेस्को जम्बो कोविड केंद्रात (Nesco Jumbo Covid Center) २४ तास रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून सीटीस्कॅन केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात आले. अद्ययावत सिटी स्कॅन मशीन (CT scan machine) वेळेत अहवाल प्राप्ती असे या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य (The feature of laboratory) आहे.

    मुंबई (Mumbai).  नेस्को जम्बो कोविड केंद्रात (Nesco Jumbo Covid Center) २४ तास रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून सीटीस्कॅन केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात आले. अद्ययावत सिटी स्कॅन मशीन (CT scan machine) वेळेत अहवाल प्राप्ती असे या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य (The feature of laboratory) आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Additional Municipal Commissioner Suresh Kakani) यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

    अडीच कोटी रुपयांची सीटीस्कॅन मशीन पीपीपी माॅडेलअंतर्गत आणण्यात आली असून या कक्षाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या एका महिन्यापासून या प्रयोगशाळा आणि सीटीस्कॅन केंद्रासाठीची तयारी केली जात होती. यामुळे जम्बाे नेस्को कोविड केंद्र आता अधिक सुविधायुक्त झाले असून पालिका रुग्णालयातील आणि नेस्को जम्बाे केंद्रांतील कोविड रुग्णांना या केंद्रात पालिका रुग्णालयातील दराप्रमाणेच सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

    याबाबत खासगी कंपनी आणि पालिकेचा करार होणार आहे. या करारानंतर पालिका रुग्णालयांच्या दराप्रमाणेच १२०० रुपयांना ही सीटीस्कॅन करुन घेता येईल असे नेस्को जंबो कोविड अधिष्ठाता डाॅ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. सीटीस्कॅनसाठी सध्या ६ महिन्यांचा करार करण्यात आला आहे. जर कोविडचे रुग्ण वाढले तर करार वाढवला जाणार आहे.

    आपत्कालीन रुग्णांच्या चाचण्यांसाठी थायरोकेअर लॅबवर अवलंबून राहावे लागत होते. आता प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याने अहवालाला होणारा विलंब तसेच झटपट लॅब तपासणी शक्य होणार आहे. सिरम इलेक्ट्राॅलाईट, बायोकेमिकल सारख्या महत्त्वाच्या चाचण्याचा अहवाल ही २ ते ३ तासांत मिळणार आहे.