Kidney transplantation successful despite blood group separation; The first surgery at Nair Hospital

देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा लौकिक पालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा आहे. दर्जेदार उपचार, वैदयकीय सेवा, शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल २ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे.या अंतर्गत ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्‍ये ३ रे स्थान देत महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला ५ वे स्थान दिले आहे.

    मुंबई : देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा लौकिक पालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा आहे. दर्जेदार उपचार, वैदयकीय सेवा, शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल २ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे.या अंतर्गत ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्‍ये ३ रे स्थान देत महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला ५ वे स्थान दिले आहे.

    महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
    एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील २ वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मार्च २०२० पासून उदभवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने आत्यंतिक काळजी घेतली जात आहे.

    २४ तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय असल्याची माहिती डॉ. अंद्राडे यांनी दिली आहे.

    एकाचवेळी २ सर्वेक्षणांमध्ये गौरव

    देशभरातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदाच्या वर्षी २ वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली त्यामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे २ नामांकित नियतकालिकांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.

    सर्वेक्षणात ५ वे स्थान

    ‘द वीक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशपातळीवरील सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून विविध दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला देशभरात ५ वा क्रमांक बहाल करण्यात आला आहे.

    सर्वेक्षणात ३ रे स्थान

    ‘आऊटलुक’च्या पुढाकाराने देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्वेक्षणात महानगरपालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने शासकीय महाविद्यालय गटामध्‍ये तिसरे स्थान पटकाविले आहे.

    गुणवत्ता टिकविली

    सन २०२१ मध्ये दोन वेगवेगळ्या संस्थांद्वारे देशभरातील दंत महाविद्यालयांचे शास्त्रीय पद्धतीने विविध निकषांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारितील नायर दंत महाविद्यालयाच्या कामगिरीवर वेगवेगळ्या दोन सर्वेक्षणांमध्ये गौरवपूर्ण शिक्कामोर्तब करण्यात आल्याने नायर दंत महाविद्यालयाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा व त्यांची गुणवत्ता आणि सर्वंकष कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.