24 kg heroin seized in Mumbai

मुंबईत डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सने मोठी कारवाई करत २४ किलो हेरॉईन जप्त केले आहे( 24 kg heroin seized in Mumbai ). ते तेलाच्या डब्ब्यांमध्ये लपवून आणण्यात येत होते. अफगाणिस्तानातून होणाऱ्या तस्करीवर कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मागील महिन्यात गुजरातच्या मंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो कोकेन जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर रेव्हेन्यु इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.

    मुंबई : मुंबईत डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सने मोठी कारवाई करत २४ किलो हेरॉईन जप्त केले आहे( 24 kg heroin seized in Mumbai ). ते तेलाच्या डब्ब्यांमध्ये लपवून आणण्यात येत होते. अफगाणिस्तानातून होणाऱ्या तस्करीवर कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मागील महिन्यात गुजरातच्या मंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो कोकेन जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर रेव्हेन्यु इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.

    डीआरआयच्या मुंबई झोनल विभागाला यासंदर्भात महिती मिळाली होती. तेलाच्या कॅनमध्ये काँट्राबँड म्हणजेच हेरॉईनजन्य अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती या विभागाला मिळाली. नॉर्मल चेकिंग दरम्यान तेलाच्या डब्यांमधील या पदार्थाचा शोध लागला नसता. तसेच डब्यांची चाचपणी केल्यानंतरही तस्करी उघडकीस आली नसती.

    मात्र, कसून चौकशी केल्यानंतर काही वेळातच सत्य समोर आले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मोहोरीच्या तेलाच्या डब्यांची चाचपणी केली. यावेळी हेरॉईन हस्तगत करण्यात आले. इराणच्या चबाहर बंदरावरून हे कंटेनर दक्षिण मुंबईत येणार होते. कंदाहरच्या व्यक्तीने ते पाठवले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.