25 killed in road mishaps: PM condoles, announces help from Center

मुंबईत पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारच्या मदतीची घोषणा केली आहे त्यानंतर  भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.  पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

  मुंबई : मुंबईत पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारच्या मदतीची घोषणा केली आहे त्यानंतर  भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.  पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

  पंतप्रधानाची शोकभावना

  या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.  मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

  गृहमंत्र्याचे ट्विट

  देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील चेंबूर येथील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी व्टिट करत म्हटले आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

  संरक्षक भिंतच घरांवर कोसळल्याने दुर्घटना

  शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे १७ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.