२५ लाख परप्रांतीय मुंबईच्या दिशेने रवाना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus ) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे २५ लाख प्रवासी विशेष रेल्वे गाडय़ांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. यामध्ये उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

केंद्र सरकारकडून (Central Government) संपूर्ण देशात सहा महिन्यांपूर्वी लॉक़डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातून अनेक परप्रांतीय आपल्या मूळ गावी गेले होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल होताच अनेक परप्रांतीय परराज्यातून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना होत आहेत. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus ) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे २५ लाख प्रवासी विशेष रेल्वे गाडय़ांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. यामध्ये उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

मध्य रेल्वेवरून सर्वाधिक १६ लाख प्रवासी आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अनेक कामगार, मजुर कुटुंबीयांसह परराज्यात रवाना झाले. त्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्या.  जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होण्यास सुरुवात झाली आणि आपले बिघडलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी परराज्यात गेलेला मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागला आहे.

मध्य रेल्वेच्या विशेष गाडय़ांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी १५ विशेष गाडय़ा सोडल्या. तेवढय़ाच गाडय़ा मुंबईत येत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एकूण १६ लाख ५० हजार जण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.