st maharashtra

नोकरदारांना मुंबईत येताना होणारा गर्दीचा त्रास पाहून बेस्टच्या मदतीला एसटीच्या अडीचशे गाडय़ा भाडय़ाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकासह २५० गाडय़ा बेस्टच्या मार्गावर धावणार (250 trains will run in the service of ST 'BEST') आहे. तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी या गाड्या लवकरच तत्पर राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona virus) राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये (Lockdown) थोडी शितीलता आणली आहे. मात्र, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई महापालिका (BMC) एसटीच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेणार आहे. नोकरदारांना मुंबईत येताना होणारा गर्दीचा त्रास पाहून बेस्टच्या मदतीला एसटीच्या अडीचशे गाडय़ा भाडय़ाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकासह २५० गाडय़ा बेस्टच्या मार्गावर धावणार (250 trains will run in the service of ST ‘BEST’) आहे. तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी या गाड्या लवकरच तत्पर राहणार आहे.

बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर (Anil Patankar ) यांनी वाढती गर्दी लक्षात घेता पालिकेने पुढाकार घेऊन एसटीच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याची सूचना सरकारला केली असून नुकत्याच एसटी महामंडळानेही १४० अतिरिक्त गाडय़ा मुंबई महानगरात सुरू केल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बसगाडय़ा आहेत. परंतु यातील काही गाडय़ांचे आयुर्मान संपल्याने व भाडेतत्त्वावरही १,२०० पैकी केवळ ४६० गाडय़ाच दाखल झाल्याने बेस्ट पूर्णपणे गाडय़ा चालवू शकत नाही.