मुंबईतील रस्त्यांवर अजूनही २५ हजार खड्डे; पालिका विरोधी पक्ष नेत्याचा आरोप

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा पालिका दिखावा करत आहे. व कंत्राटदारांचे खिसे भरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे चार वेळा खड्डा बुजविल्यानंतरही पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. खड्डयांचा प्रश्न कायम स्वरूपी मिटला पाहिजे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरले पाहिजे, असेही रवी राजा यांनी सांगितले. पण कंत्राटदार जाणूनबुजून दर्जेदार मटेरियल बनवत नाहीत. तसे केले तर पुन्हा त्यांना काम मिळणार नाही असेही ते म्हणाले.

    मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर पडलेले ३३,१५६ खड्डे गेल्या १ एप्रिल ते ११ सप्टेंबर या कालावधी दरम्यान बुजवले असल्याचा दावा केला आहे. मात्र पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका प्रशासनाचा हा दावा सपशेल खोटा असल्याचे सांगून मुंबईत आजही विविध रस्त्यांवर किमान २५ हजार खड्डे असल्याचे सांगितले. पालिकेने बुजविलेल्या खड्डयांचा अहवाल द्यावा.अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

    रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा पालिका दिखावा करत आहे. व कंत्राटदारांचे खिसे भरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे चार वेळा खड्डा बुजविल्यानंतरही पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. खड्डयांचा प्रश्न कायम स्वरूपी मिटला पाहिजे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरले पाहिजे, असेही रवी राजा यांनी सांगितले. पण कंत्राटदार जाणूनबुजून दर्जेदार मटेरियल बनवत नाहीत. तसे केले तर पुन्हा त्यांना काम मिळणार नाही असेही ते म्हणाले.

    रस्त्याच्या कडेला केबल, गॅस पाईपलाईन व इतर युटिलिटी टाकण्यासाठी विविध कंपन्या चर खोदतात. ते चर  खोदण्याची परवानगी देताना पालिका संबंधित कंपनीकडून पैसे घेते.व नंतर चर बुजविण्याचे काम स्वतः करते.हे चर बुजविण्यासाठी वजा ४५ टक्के दराने निविदा आल्या आहेत. या इतक्या कमी दरात कंत्राटदार चर कसे बुजविणार? असा सवालही रवी राजा यांनी केला आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना