राज्यात २५,६८१ नवीन रुग्णांची नोंद तर १० रुग्णांचा मृत्यू

मुंबईत दिवसभरात ३०६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३५५९१४ एवढी झाली आहे. तर आज १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आतापर्यंत ११५६९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मुंबई: आज राज्यात २५,६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,२२,०२१ झाली आहे. आज १४,४०० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २१,८९,९६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,७७,५६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू पालघर-५, सातारा-३, सोलापूर-२, नागपूर-१ आणि नाशिक-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८०,८३,९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,२२,०२१ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,६७,३३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत ३०६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद :
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ३०६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३५५९१४ एवढी झाली आहे. तर आज १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आतापर्यंत ११५६९ मृत्यूची नोंद करण्यात आली.