राज्यात २७४० नवीन काेराेना रुग्ण; मुंबईत ३४५ नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत

    मुंबई (Mumbai) : राज्यात सोमवारी २,७४० नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new corona-infected patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,००,६१७ झाली आहे. काल ३२३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०९,०२१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (the cure rate in the state) ९७.०५ % एवढे झाले आहे.

    राज्यात आज रोजी एकूण ४९,८८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात सोमवारी २७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६०,८८,११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,००,६१७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९९,१९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत ३४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
    मुंबईत दिवसभरात ३४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५४०० एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६०२८ मृत्यूची नोंद करण्यात आली.