धारावीत २८  नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या वर २१३४ ;दादर १४ तर माहीम मध्ये ही २५ रुग्ण मुंबई : धारावीतील परिस्थिती गुरुवारी ही नियंत्रणात असल्याचे दिसते. धारावीत आज २८ नवीन

धारावीतील रुग्णसंख्या  वर  २१३४ ; दादर १४ तर माहीम मध्ये ही २५ रुग्ण

मुंबई  :  धारावीतील परिस्थिती गुरुवारी  ही नियंत्रणात असल्याचे दिसते. धारावीत  आज २८ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या २१३४ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत आहे.धारावीत आज 28 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २१३४ वर पोहोचली आहे. तर माहीम मध्ये आज २५ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ८६४ इतकी झाली आहे.तर दादर मध्ये आज १४  नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या ही ६०१ इतकी झाली आहे.

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३५९९ इतकी झाली आहे.