अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो

अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिध्द करण्यात अाली असून दुसऱ्या यादीमध्ये मुंबई विभागातून तब्बल ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली. मात्र त्यातील अवघ्या २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १० हजार ९७ जागांवर विद्यार्थ्यांनी कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्के असून, तिसऱ्या फेरीसाठी तब्बल १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

मुंबई (Mumbai).  अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिध्द करण्यात अाली असून दुसऱ्या यादीमध्ये मुंबई विभागातून तब्बल ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली. मात्र त्यातील अवघ्या २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १० हजार ९७ जागांवर विद्यार्थ्यांनी कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्के असून, तिसऱ्या फेरीसाठी तब्बल १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

अकरावीच्या पहिल्या फेरीमध्ये केंद्रीय प्रक्रिया आणि कोट्यातील जागा मिळून ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने अकरावीची प्रवेश फेरी राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नुकतीच दुसरी यादी जाहीर करण्यात अाली अाहे. या फेरीमध्ये ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली. कोट्यातील विद्यार्थ्यांसह ३८ हजार १५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतर अकरावीच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १६ हजार १६८ इतकी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

दुसऱ्या फेरीमध्ये सर्वात अधिक प्रवेश वाणिज्य शाखेमध्ये १६ हजार १३५, विज्ञान शाखेमध्ये ८ हजार ५६२, कला शाखेमध्ये २ हजार ९६८ तर एमसीव्हीसी ३९६ प्रवेश झाले. पहिल्या पसंतिक्रम मिळालेल्या २० हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

तिसऱ्या गुणवता यादीसाठी शाखानिहाय उपलब्ध जागा
शाख आणि उपलब्ध जागा
कला– १४,५५७
वाणिज्य — ६३,३५९
विज्ञान — ३८,८६९
एमसीव्हीसी — २७९६
—————————–
एकूण जागा — १,१९,५८१