धारावीत २९ नवे रुग्ण, मृतांचा आकडा १०७

दादर-माहीम मधील रुग्णवाढ अद्याप नियंत्रणात ; धारावीतील रुग्णसंख्या २०१३ वर मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना आज रुग्णसंख्या वाढली असल्याचे समोर

दादर-माहीम मधील रुग्णवाढ अद्याप नियंत्रणात ; धारावीतील रुग्णसंख्या २०१३ वर  

मुंबई  :  धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना  आज रुग्णसंख्या वाढली असल्याचे समोर आले.शुक्रवारी २९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून धारावीतील रुग्णसंख्या २०१३ वर पोहोचली आहे.तर दुसरीकडे,  दादर-माहीम परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली असल्याचे समोर येत आहे.  आज धारावीत २९ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २०१३ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ७७ वर पोहोचला आहे. 

माहीम मध्ये आज १६ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ७३० इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतका आहे. तर दादर मध्ये आज १५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही ४८६ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १६ मृत्यू झाले आहेत.  दादर आणि माहीम मधील परिस्थिती  नियंत्रणात आल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ६० नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३२२९ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७ इतका आहे.