कल्याण डोंबिवलीत २९ नवीन रुग्ण

तिघांचा कोरोनामुळे मृत्यू ; कोरोना रुग्णांची संख्या १४२८ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात २९ नवीन रुग्णांची भर पडली असून तिघांचा कोरोनाने

तिघांचा  कोरोनामुळे मृत्यू ; कोरोना रुग्णांची संख्या १४२८

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात २९  नवीन रुग्णांची भर पडली असून  तिघांचा  कोरोनाने मृत्यू झाला आहे.  आजच्या या २९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १४२८  झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४०  जणांचा मृत्यू झाला असून ८१२  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५७२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १७, कल्याण पश्चिमेतील ८, डोंबिवली पूर्वेतील ३,  तर टिटवाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये  १६ पुरुष तर  १३  महिला आहेत. आजच्या या रुग्णांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा येथील ७० वर्षीय पुरुषचा आणि ७५ वर्षीय महिलेचा, कल्याण पूर्वेतील  काटेमानिवली जाईबाई शाळेजवळील ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील  एफ केबिन रोड, नाना पावशे चौक रोड, विजय नगर, तिसगाव, साईबाबा नगर, कोळशेवाडी, हनुमान नगर, परशुराम वाडी, काटेमानिवली, आंनदवाडी, खडगोळवली रोड, कल्याण पश्चिमेतील काळा तलाव, रोहिदास वाडा, जोशीबाग, लालचौकी, आधारवाडी, डोंबिवली पूर्वेतील रामनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, टिटवाळा येथील दळवी वाडा मांडा आदी परिसरातील आहेत.