25 killed in road mishaps: PM condoles, announces help from Center

    मुंबई : मुंबईत गेल्या १९९२ ते २०२१ कालावधीत गेल्या २९ वर्षांत दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये २९० रहिवाशांचा मृत्यू ओढविला असून ३०० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

    दरवर्षी पावसाळ्याच्या सुमारास धोकादायक दरडींकडे राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा मुंबई महापालिका देते. मात्र, त्या इशाऱ्यातून काहीही साध्य झालेले नाही. मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघात २५७ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर झाली आहेत.

    येथे अजूनही २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, उर्वरित झोपड्यांकडील टेकड्यांच्या आजूबाजूस संरक्षक भिंत बांधण्याचीही शिफारस केले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती अधिकारात घेतली आहे.