मुंबईतील कोरोनाची स्थिती आटोक्यात, ३० हजार बेडपैकी २९५०० बेड रिक्त -२२५५ सक्रिय रुग्ण

मुंबई(Mumbai) पालिकेने सज्ज ठेवलेल्या ३० हजार बेडपैकी फक्त ५०० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे २९५०० बेड रिक्त(beds Vacant In Covid Centers) आहेत.

    मुंबई: मुंबईत कोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) आटोक्यात आली असल्यामुळे पालिकेने सज्ज ठेवलेल्या ३० हजार बेडपैकी फक्त ५०० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे २९५०० बेड रिक्त(beds Vacant In Covid Centers) आहेत. सध्या सक्रिय असलेल्या २२५५ रुग्णांमधील निम्म्याहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने ते घरीच क्वॉरंटाईन असल्याची माहिती मुंबई पालिका(BMC) प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबईतील कोरोनाची स्थिती सध्या चांगलीच आटोक्यात आली असल्याने बेड रिक्त राहत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सध्या बेड रिक्त असले तरी तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पालिका सतर्क आहे.

    मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के झाला आहे. तर आठवडयाचा रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १८८४ दिवसांवर पोहोचला आहे. पालिकेने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहिसर, मालाड, गोरेगाव नेस्को, बीकेसी कुर्ला, एनएससीआय वरळी, मुलुंड अशी सहा जम्बो कोविड सेंटर तैनात ठेवली आहेत. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्स, कांजूरमार्ग, सोमय्या मैदान या ठिकाणीही जम्बो कोविड सेंटर प्रस्तावित आहेत. मात्र सद्यस्थितीत सेव्हन हिल्स रुग्णालयात ३७० रुग्ण, बीकेसीत ८, मुलुंड ३८(१६५० बेड), नेस्को फेज,एकमध्ये १६ (२२१५ बेड), फेज दोनमध्ये २ (१५००), एनएससीआय (५५० बेड) ३५ असे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.