3 ministers dealing with women; What does Kirit Somaiya say about Dhananjay Munde case ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे प्रकरणाबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे प्रकरणाबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली.

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या महिलेने ओशीवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली.

“धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप होत असल्याचा हल्लाबोल सोमय्यांनी केला आहे.