sanjay gandhi national park

या जलाशयांवर एखादा मृत पक्षी आढळून आल्यास या मृत पक्ष्याबाबतची माहिती तात्काळ वन अधिकाऱ्यांना कळविणे इतर कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पार्कातील कर्मचाऱ्यांचा एक व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

मुंबई: बर्ड फ्लूच्या (Bird flue)  पार्श्वभूमीवर, बोरीवली येथील नॅशनल पार्कमधील ( Sanjay Gandhi National park) छाेटी माेठी जलाशये व तलावावर येणाऱ्या प्रत्येक स्थलांतरीत पक्ष्यांवर पार्कातील वन अधिकाऱ्यांकडून ( forest department) करडी नजर ठेवण्यात येत आहे. पार्कात छाेटी-माेठी साधारण ३० पेक्षाही अधिक खुली जलाशये असून ही जलाशय महत्वाची असल्याने येथे चाेवीस तास अधिकारी लक्ष ठेवून आहेत. या जलाशयांवर मृत पक्षी आढळून आल्यास त्याबाबत पार्कातील वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना तत्काळ कळविणे इतर कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. पण सुदैवाने, अजूूनही नॅशनल पार्कमध्ये काेणाताही मृत पक्षी आढळून आला नसल्याचे अधिकारी सांगतात.

बाेरीवली येथील नॅशनल पार्क हे पूर्व उपनगर व पश्चिम उपनगराला खेटून असलेले पार्क आहे. या पार्काचा विस्तार माेठा असल्याने या पार्कात अनेक पक्षी व प्राण्यांचे वास्तव आहे. पार्कामध्ये छाेटी-माेठी अशी ३० पेक्षाही अधिक खुली जलाशये आहेत. यािशवाय बरेच कृत्रिम तलावदेखील आहेत. अजुूनही पार्कातील अनेक जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असल्याचे अधिकारी सांगतात. ज्यामुळे हजाराे विविध पक्षी नत्यिनियमाने या जलाशयांवर येत असतात. याशिवाय स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रमाण देखील येथे माेठ्या संख्येने आहे. ज्यामुळे बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर, येथील जलाशयांवर मागील काही दिवसांपासून चाेवीस तास करडी नजर ठेवली जात असल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

 


दरम्यान, या जलाशयांवर एखादा मृत पक्षी आढळून आल्यास या मृत पक्ष्याबाबतची माहिती तात्काळ वन अधिकाऱ्यांना कळविणे इतर कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पार्कातील कर्मचाऱ्यांचा एक व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. पार्कात काहीही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित कर्मचाऱ्याने फाेटाे काढून ग्रुपवर टाकणे , व त्यानंतर त्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यािशवाय पार्कातील पक्ष्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पक्ष्यांजवळ जाण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
———————————————————————————————————————-

पार्कात अनेक खुली जलाशये आहेत या जलाशयांवर कर्मचारी नजर ठेवून असून येथे काेणताही अनुचित प्रकार आढळल्यास त्वरीत वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी एक स्वंतत्र व्हाॅट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आला आहे. परंतु अद्याप पार्कात एकही मृत पक्षी अथवा काेणताही अनुिचत प्रकार आढळून आलेला नाहीये. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर, आम्ही डाॅक्टरांची एक स्वतंत्र टीम तयार केली आहे.

जी. मल्लिकार्जुन, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

—————————————-