corona vaccine

भारत बायाेटेकद्वारे(bharat bioteck) बनविण्यात येत असलेली कोरोना वॅक्सीनची(corona vaccine) चाचणी राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयानंतर आता पालिकेच्या सायन रुग्णालयात आजपासून सुरु झाली आहे. या वॅक्सीनसाठी ३०० स्वयंसेवकांनी नाेंद केली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई: भारत बायाेटेकद्वारे(bharat bioteck) बनविण्यात येत असलेली कोरोना वॅक्सीनची(corona vaccine) चाचणी राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयानंतर आता पालिकेच्या सायन रुग्णालयात आजपासून सुरु झाली आहे. या वॅक्सीनसाठी ३०० स्वयंसेवकांनी नाेंद केली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केईएम, नायर, जे.जे. व आता सायन रुग्णालयात कोराेना वॅक्सीनची चाचणी सुरु झाली आहे. याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. माेहन जाेशी यांनी सांगितले की, भारत बायाेटेक ‘काे-वॅक्सीन’ चाचणीचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. याकरीता नाेंदणी करण्यात आलेल्या ३०० स्वयंसेवकांना टप्प्याटप्प्याने डाेस देण्यात येणार आहे. यात काहींना वॅक्सीनचा डाेस तर काही प्लेसिबाे देण्यात येणार आहे तर एक हजार स्वयंसेवकांवर या वॅक्सीनची चाचणी हाेणार असल्याची डाॅ. जाेशी म्हणाले.