30:30:40 चा फॉर्म्युला; बारावीचा निकाल याच महिन्यात

इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे. त्यानुसार आता मुल्यमापन निकालाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे याच महिन्यात बारावीचा निकाल जाहीर होईल.

    मुंबई : बारावी निकालाचा तिढा सुटला असून सीबीएसईच्या 30:30:40 या सूत्रानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे. त्यानुसार आता मुल्यमापन निकालाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे याच महिन्यात बारावीचा निकाल जाहीर होईल.

    शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन कसे करावे? याबाबतच्या सूचना परिपत्रक काढून जाहीर केल्या आहेत. 7 जुलैपासून अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना सुरु करायचे असून 23 जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करून निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. याबाबतीच माहिती . शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली आहे.