गणेशोत्सव मंडपासाठी ३०४ गणेशोत्सव मंडळांना परवानगी, ८६ मंडळांना परवानगी नाकारली

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षापासून गणेशोत्सवावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आला असला तरी संभाव्य कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने पुन्हा निर्बंध घातले आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्य़ा पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मुंबईत १२ हजाराहून सार्वजनिक मंडळे आहेत. गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी मंडळांना दरवर्षी पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते.

    मुंबई – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फक्त ३०४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. एकूण १२८८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले होते. यातील ८६ मंडळांचे अर्ज अपू-या कागदपत्रामुळे परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

    कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षापासून गणेशोत्सवावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आला असला तरी संभाव्य कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने पुन्हा निर्बंध घातले आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्य़ा पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मुंबईत १२ हजाराहून सार्वजनिक मंडळे आहेत. गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी मंडळांना दरवर्षी पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते.

    यंदा मंडप परवानगीसाठी पालिकेला १,२८८ अर्ज प्राप्त झाले. पडताळणीअंती १४१ मंडळांनी दोन वेळा अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरित १,१४७ मंडळांपैकी ३०४ मंडळांना मंडप परवानगी दिली आहे, तर ८६ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ७५७ मंडळांचे अर्ज विविध प्रक्रियेत आहेत. या अर्जांची परवानगीसाठी पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. अंती त्यांनाही परवानगी मिळेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.