कल्याण डोंबिवलीत ३१  नवीन रुग्ण

कोरोना रुग्णांची संख्या ९४२ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ३१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना

कोरोना रुग्णांची संख्या ९४२

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१  नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ३१  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  ९४२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून ३२६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५८९  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १७, कल्याण पश्चिमेतील ७, डोंबिवली पूर्वेतील ४, डोंबिवली पश्चिमेतील २, ठाकुर्लीतील १ रुग्ण आहे. यामध्ये १९ पुरुष तर ९ महिला, १ बालक आणि २ बालिकांचा समावेश आहे.

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, आनंदवाडी, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, लोकधारा, तिसगाव, नेतिवली, जरीमरी मंदिराजवळ, चक्कीनाका,   कल्याण पश्चिमेतील भारताचार्य चौक, मिलिंद नगर, वायलेनगर, छत्री बंगल्या जवळ, ठाणगेवाडी, गांधारी,  डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली गाव, नांदिवली रोड, गणेश नगर, सावरकर रोड, डोंबिवली पश्चिमेतील दिनदयाल क्रॉस रोड, शास्त्री नगर,  ठाकुर्लीतील खंबाळपाडा या  परिसरातील आहेत.