25 killed in road mishaps: PM condoles, announces help from Center

    मुंबई : गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे दुर्घटना होउन ३२ जणांचे प्राण गेले आहेत. बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती याचे पडसाद उमटण्याची शकयता आहे. भाजप सदस्य या दुर्घटनांवरून सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाला लक्ष करण्याची शक्यता आहे.

    मुंबईत शुक्रवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबून रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होऊन मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. लोकल बंद पडल्यामुळे प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून चालत जाऊन रेल्वे स्टेशन गाठावे लागले. भांडुप, विक्रोळी,चेंबूर, पवई येथे दरडी कोसळण्याचे व भांडुप येथे भिंत कोसळण्याची दुर्घटना घडून जवळपास ३२ लोकांचा मृत्यू झाला आणि १८जण जखमी झाले.

    भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात प्रथमच पाणी शिरले. ते कसे शिरले? याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवस लोकांना पाणी मिळाले नाही. पाण्यावाचून लोकांचे हाल झाले. डोंगरावरील झोपडयांच्या बाबतीत अदयाप निर्णय् घेण्यात आलेला नाही. तो घ्यावा अशी मागणी भाजप सदस्य करतील आणि त्याचे पडसाद स्थायी समितीत उमटणार असल्याचे दिसून येत आहे.