The second wave is worse than the first: when the little ones are vaccinated; If you want to keep children away from the corona ...

मोठ्या शहरांतील संख्याही घटली आहे तथापि, तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 34486 मुलांना कोरोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानेच चिंताही व्यक्त केली जात आहे. गेल्या 26 दिवसातील ही संख्या असल्याचे सांगण्यात येते. ही सर्व मुले 10 वर्षेपर्यंतच्या वयोगटातील आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असली तरी याच मे महिन्यात मात्र लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढलेला आहे. दीड महिन्यांपासून राज्यात कठोर निर्बंध लागू असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

    मोठ्या शहरांतील संख्याही घटली आहे तथापि, तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 34486 मुलांना कोरोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानेच चिंताही व्यक्त केली जात आहे. गेल्या 26 दिवसातील ही संख्या असल्याचे सांगण्यात येते. ही सर्व मुले 10 वर्षेपर्यंतच्या वयोगटातील आहेत.

    मे महिन्याच्या प्रारंभी कोरोनाबाधित मुलांची संख्या 1.36 लाख होती. 26 मे रोजी ही आकडेवारी 1,73,060 वर पोहोचली. 11 ते 20 या वयोगटातील एक मे रोजीची बाधितांची आकडेवारी 3,11,455 होती. 26 रोजी ही आकडेवारी 3,98,266 वर पोहोचली.