धारावीत सहा दिवसांत ३६४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई :वरळी पाठोपाठ धारावी झोपडपट्टी कोरोना विषाणूचे केंद्र बिंदू ठरत आहे. गेल्या सहा दिवसांतच ३६४ नव्या कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची नोंद झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ वर पोहोचला आहे. तर

मुंबई : वरळी पाठोपाठ धारावी झोपडपट्टी कोरोना विषाणूचे केंद्र बिंदू ठरत आहे. गेल्या सहा दिवसांतच ३६४ नव्या कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची नोंद झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ वर पोहोचला आहे. तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. 

आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा गुणाकार सुरु असून धारावीत कोरोनाला रोखणे आरोग्य विभागासमोर मोठे आवाहन आहे. धारावी झोपडपट्टीची लोकसंख्या १० लाखांच्या घरात असून दाटीवाटीच्या झोपडपट्टीत तीन चार माळ्याची घरे उभारली आहेत. धारावी ९० फूट रोड, आंबेडकर चाळ, कुंभारवाडा, राजीव गांधी नगर, मदिना नगर, पीएमजीपी कॉलनी, गंगाधार चाळ, विजय नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, टाटा कॉलनी, अबु बकर चाळ, जनता हौसिंग सोसायटी, ६० फूट रोड, न्यू म्युन्सिपल चाळ, धारावी पोलीस ठाणे परिसर, इंदिरा नगर, माटुंगा लेबर कॅम्प, कल्याण वाडी, शास्त्री नगर असे परिसर असून या ठिकाणी मुंबईबाहेरुन कामानिमित्त आलेल्या कामगारांची संख्या ही मोठी आहे. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीतील एका घरात १० ते १५ जण राहतात. त्यामुळे धारावी झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अशक्य होत आहे. त्यामुळेच धारावीत दिवसेंदिवस कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. 

धारावीकरांसाठी आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहेत. घराघरात जाऊन लोकांची चाचणी करणे हा उपक्रम सुरू केला आहे. धारावीतील कोणाही व्यक्तीला काही त्रास वाटत असेल तर स्वतःहुन पुढे येऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी.जेणेकरून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. धारावीतील या परिसरात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.आता कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ही एकमेकांच्या संपर्कात आल्याने वाढत आहे. बुधवारपर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ७३३ वर पोहोचली असून यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य अधिकारी व्यक्त करत आहेत. 

धारावीतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेत कोरोना संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी ट्राझीटं कॅम्प शाळेत क्वारंटाईन व्हावे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी पुढाकार घेत आपल्या प्रभागातील लोकांमध्ये या बाबत जनजागृती करावी, असे आवाहन लोकप्रतिनिधी व समाजसेवक आदींना केल्याचे उत्तर विभागाचे सहाय्यक किरण दिघावकर यांनी सांगितले. 

दरम्यान,  ताप, सर्दी, खोकला याची चाचणीला आजपासून सुरुवात केली आहे.  सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चाचणी करण्यात येत असून येत असून ट्राझीटं कॅम्प शाळा,  पीएमजी काॅलनी,  मनोहर जोशी विद्यालय या ठिकाणी आरोग्य चाचणीसाठी डाॅक्टर उपलब्ध असल्याचे दिघावकर म्हणाले. 

 

सहा दिवसात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद  

१ मे  – ३८

२ मे – ८९

३ मे – ९४ 

४  मे  – ४२

५  मे  –  ३३

६ मे  – ६८