4.70 कोटी रुपये वसूल केले आणि… देशमुखांच्या पीएसमोर बसवुन होणार वाझेची चौकशी  सहा तास ईडी चौकशी

ईडीने या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व स्फोटक कार आणि हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन दिवस तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. वाझेला बराकीतून भेट कक्षातील स्वतंत्र दालनात आणण्यात आले.

    मुंबई : दक्षिण मुंबईतील कारमायल रोडवरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ एपीआय सचिन वाझे याची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तळोजा कारागृहात सहा तास कसून चौकशी केली. पोलिस दलात कार्यरत असताना मुंबईतील बार मालकांकडून करण्यात आलेली वसूली आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली.

    देशमुखांच्या पीएसमोरही होणार चौकशी

    ईडीने या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व स्फोटक कार आणि हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन दिवस तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. वाझेला बराकीतून भेट कक्षातील स्वतंत्र दालनात आणण्यात आले.

    दरम्यान, अखेरच्या टप्प्यात वाझेसोबत संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. वाझेने सीबीआयला दिलेल्या जबाबात 4.70 कोटी रुपये वसूल करून तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांच्याकडे पोहचल्याचे नमूद केले होते.