पालघर ग्रामीण मध्ये आढळले अजून ४ कोरोनाबाधित रुग्ण

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अजून चार जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.या आधी डहाणू तालुक्यातील एका ३ वर्षीय मुलीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या मुलीच्या संपर्कात आल्याने या चौघांना कोरोना चा संसर्ग झाला आहे.

 ३ वर्षीय कोरोनाबाधित चिमुकलीच्या आले होते संपर्कात

 
वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अजून चार जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.या आधी डहाणू तालुक्यातील एका ३ वर्षीय मुलीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या मुलीच्या संपर्कात आल्याने या चौघांना कोरोना चा संसर्ग झाला आहे.  मुलीच्या. या तीन वर्षीय मुलीचे कुटुंब पालघर जिल्ह्यातील एका गावात विटभट्टी मजूर म्हणून काम करीत असताना त्यांच्या सहवासातील ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात  ४५ वर्षीय पुरुष आणि ४२ वर्षीय महिला आणि ७ वर्षीय व ३ वर्षीय मुलींचा समावेश आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि पालघर तालुक्यातील एकुण संख्या  १७ झाली असून यात १ जण मयत आहे. अगोदर त्या चिमुकलीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह तर दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे.मात्र तिच्या संपर्कातील अजून एका ३ व ७ वर्षीय मुलींचा व महिला व पुरुष यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासन विभाग यांच्या माहिती सांगण्यात येत आहे.