पावसाची संततधार कायम राहिल्याने ४०० आलिशान गाड्यांचे नुकसान; नुकसान भरपाईची मालकांनी महापालिकेकडे केली मागणी

मुंबई शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडला. सखल भागात पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेकांच्या दुकानात, घराघरात पाणी साचले, सामानसुमानाच नुकसान झालं. कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मुंबई महानगर पालिकेच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसांचे पाणी शिरल्याने तिथल्या ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या.

    मुंबई : कांदिवली येथील पालिकेच्या अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये पावसाच्या पाण्यात ४८ तास बुडालेल्या आलिशान गाड्यांचे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाल्याचा ठपका गाड्यांच्या मालकांनी ठेवला असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

    मुंबई शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडला. सखल भागात पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेकांच्या दुकानात, घराघरात पाणी साचले, सामानसुमानाच नुकसान झालं. कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मुंबई महानगर पालिकेच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसांचे पाणी शिरल्याने तिथल्या ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या.

    रविवारी आणि सोमवारीही पावसाने संततधार कायम ठेवल्याने या गाड्या ४८ तास पाण्याखालीच होत्या. त्यामुळे गाड्यांच मोठ नुकसान झाले आहे. अंडरग्राऊंड पार्किंग मधील पाण्याचा उपसा पंपांच्या सहाय्याने कालच करण्यात आला असून गाड्याही हलविण्यात आल्या आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे नुकसान झाले असून आम्हाला पालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता गाड्यांचे मालक करू लागले आहेत.

    400 cars bikes autos submerged in Kandivli basement parking lot owners demanded compensation