कांदिवलीत पालिकेच्या पार्किंगमधील ४०० गाड्या पाण्याखाली

मिळालेल्या अधिक माहिती नुसार मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला.

    कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पालिकेच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसांचे पाणी शिरल्याने येथील ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. सोमवारीही पावसाने संततधार कायम ठेवल्याने या गाड्या अद्याप पाण्यातच राहिल्या असून काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

    शनिवारी मध्यरात्रीनंतर कोसळणा-या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. कांदिवलीतील पालिकेच्या पार्किंग भागातही रविवारी पाणी तुंबल्याने येथे सुमारे  ४०० गाड्या पाण्यात अडकल्या. सोमवारीही पावसाने संततधार कायम ठेवल्याने पार्किंगमधील पार्क केलेल्या गाड्यांना बाहेर काढण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या गाड्या अजूनही पार्किंगमध्येच पाण्याखाली आहे. दरम्यान पार्किंगमधील साचलेले पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.

    मिळालेल्या अधिक माहिती नुसार मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला.

    मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांनी कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.

    दरम्यान, मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात आहे.