जन आशीर्वाद यात्रे विरोधात ४२ गुन्हे दाखल; नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी असतानाही राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन राणे यांनी यात्रेला सुरुवात केली होती. तेथून टीचर्स कॉलली हायवे, सायन सर्कल, दादर, वरळी नाका, गिरगाव चौपाटी, हुतात्मा चौक अशा विविध मार्गांतून त्यांनी यात्रा काढली होती.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी मुंबईत विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राणेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते.

    कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी असतानाही राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन राणे यांनी यात्रेला सुरुवात केली होती. तेथून टीचर्स कॉलली हायवे, सायन सर्कल, दादर, वरळी नाका, गिरगाव चौपाटी, हुतात्मा चौक अशा विविध मार्गांतून त्यांनी यात्रा काढली होती.

    यावेळी कोरोना संबंधित लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शहरातील विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबुर आणि गोवंडी पोलीस ठाण्यांमध्ये १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.