मुंबईमध्ये कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, बाधितांची संख्या १४७८१ वर; तर २८ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी हा आकडा हजारच्या घरात गेला होता. परंतु मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मंगळवारी ४२६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ७८१ वर पोहचली आहे. मे मध्ये सापडत असलेल्या रुग्णांमधील हा सर्वात कमी आकडा आहे.

 मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई : मुंबईमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी हा आकडा हजारच्या घरात गेला होता. परंतु मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मंगळवारी ४२६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ७८१ वर पोहचली आहे. मे मध्ये सापडत असलेल्या रुग्णांमधील हा सर्वात कमी आकडा आहे. 
मुंबईतील मंगळवारी ४२६ नवे रुग्ण सापडले. मागील काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी असल्याने मुंबईसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र रुग्ण संख्या कमी झाली असताना मृतांचा आकडा मात्र वाढलेला आहे. मुंबईमध्ये मंगळवारी २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५५६ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २८ जणांमध्ये १७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १७ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १० जण हे ६० वर्षांवरील, तर १४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. चौघांचे वय ४० वर्षांखालील होते.
मुंबईत कोरोनाचे ६१३ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार २०६ वर पोहचली आहे. तसेच २०३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३३१३ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून  देण्यात आली.