जिल्ह्यात २४ तासांत ४४ नवे रुग्ण

जिल्ह्यात एकूण 726 कोरोना बाधित रुग्ण ; 27 जणांचा मृत्यू ; पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोव्हीड 19 चे नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल संध्याकाळी 6 वाजता पासून ते आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात

जिल्ह्यात एकूण ७२६ कोरोना बाधित रुग्ण ; २७ जणांचा मृत्यू ;

 

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोव्हीड १९ चे नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल संध्याकाळी ६ वाजता पासून ते आज संध्याकाळी ६वाजेपर्यंत जिल्ह्यात ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातली कोव्हीड १९ च्या रुग्णांची संख्या ही ७२६ वर पोहचली आहे. त्यापैकी २७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर बऱ्या झालेल्या ३०२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

आज पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या धुंदलवाडी इथं असलेल्या वेदांता हॉस्पिटल मधल्या एका २२ वर्षीय डॉक्टर ला ही कोव्हीड १९ ची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते या वेदांता हॉस्पिटल मध्ये आयसीयू डॉक्टर म्हणून कार्यरत होते. हॉस्पिटल मधल्याच वसतिगृहात असलेल्या निवासस्थानात ते राहत होते. मात्र कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

 

तर वसई तालुक्यातल्या अर्नाळा मधल्या एसटी पाडा तालुक्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या एका ४१ वर्षीय महिलेला आणि ४६ वर्षीय व्यक्तीला देखील कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचं त्यांच्या चाचणीतुन स्पष्ट झालं.  प्रतिबंधित क्षेत्र सर्वेक्षणात SARI/ILI लक्षणे आढळल्यामुळे या दोन्ही जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

 

तसचं वसई तालुक्यातल्या तीवरी इथं राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या एका १० वर्षीय मुलीला आणि ३३ वर्षीय व्यक्तीला घरातल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं कोव्हीड १९ ची लागण झाली आहे.कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले असल्यानं यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.ज्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

 

 

 

जिल्ह्यातली सद्यस्थितीत रुग्ण संख्या :

 

पालघर तालुका – ३१ (२ मृत्यू )

 

डहाणू तालुका – १७

 

जव्हार तालुका – १

 

वाडा तालुका – ५

 

वसई ग्रामीण – ३० ( १ मृत्यू )

 

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्र