मुंबईमध्ये ८ महिन्यांत ४४० बलात्काराच्या घटना ; महिला असुरक्षिततेत दिल्लीनंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ परंतु देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही महिला सुरक्षित नाहीत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्लीनंतर महिला असुरक्षिततेच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा जानेवारी ते ऑगस्ट २०२० या कालावधीत महिला आणि मुलींवर बलात्काराच्या ४४० घटना घडल्या़ दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कारानंतर कठोर कायदे करण्यात आले होते, तरीही महिलांवरील बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना थांबलेल्या नाहीत़
एनसीआरबीच्या दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये देशातील १९ बड्या शहरांमध्ये महिलांविरूद्धच्या गुन्ह्यांची ४५,४८५ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यापैकी दिल्लीत २८ टक्के १२,९०२ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून मुंबईनंतर १४.३ टक्के गुन्ह्यांसह ६,५१९ गुन्हे दाखल आहेत.बलात्काराच्या घटना दिल्लीमध्ये सर्वाधिक, उदयपुरात ५१७ आणि मुंबईत ३९४ घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या प्रकरणात मुंबई दिल्ली आणि उदयपूरनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान महिला आणि मुलींवर बलात्काराच्या १,०१५ आणि २,६७५ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यात एकट्या मुलींवर बलात्काराच्या ६२२ घटना घडल्या.

यावर्षी २१ जानेवारी रोजी कुर्ला येथे एका ३३ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. मूळची वरळीतील प्रेम नगरमधील मध्य प्रदेशातील कटनी येथे राहणारी-३३ वर्षीय रीना (नाव बदलले आहे) यांची सासू आजारी होती. २१ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता ती भायखळा येथून लोकल ट्रेनने कुर्ला रेल्वे स्थानकावर पोहोचली.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मध्य प्रदेशमधील कटनी या मार्गावर त्यांना द्रुतगती ट्रेन पकडावी लागली. रीना लवकर घराबाहेर पडली, तिला ट्रेन पकडण्यासाठी वेळ मिळाला. पैशाची बचत करण्यासाठी रिक्षातून जाण्याऐवजी कुर्ला रेल्वे स्थानकावरून पायी चालत लोकमान्य टिळक टर्मिनसकडे गेली. जाताना ती कुर्ला (पूर्व) येथील साबळे नगर येथील झुडुपामध्ये शौचास गेली. यावेळी २ तरुण तिथे आले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ितथून जात असलेल्या २ तरूणांनी ही घटना पाहिली, त्या महिलेला वाचविण्याऐवजी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

नेहरू नगर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. ७ फेब्रुवारीला जय महाराष्ट्र नगर, मिलिंद नगर, सांताक्रूझ (पूर्व) वाकोला येथे राहणाऱ्या विनोद धाडी (वय ३५) यांच्या घरामध्ये या ३० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला.

वाकोला पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले की, विनोदने त्याचा मित्र सुनील कदम (वय ३४) याच्यासह महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला होता. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत मुंबईत सामूहिक बलात्काराचे ९ गुन्हे दाखल झाले.